जळगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संस्थेला शंभर वर्षाचा इतिहास असताना अनेक वादांकित विषयांनी संस्था चर्चेत आली आहे. कधी भोईटे गट तर पाटील गट एकमेकांच्या कुरघोड्या करत असतात यात भर पडली गिरीष महाजन यांच्याविषयी झालेल्या आरोंपापासुन ते थेट गुन्हा दाखल झाल्याने. आता पुन्हा संस्थेतील भ्रष्ट यंत्रणेमुळे त्रस्थ झालेले शिक्षक नाडले जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कोरोना काळात बदल्यांचे प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड झाल्याचेही बोलले जात आहे. ‘अर्थ’पुर्ण सहकार्यासाठी जळगावातील एक गट सक्रिय झाल्याची दबक्या आवाज कुजबूज सुरू आहे. बदल्यांचे प्रस्ताव मंजूर होऊ नये यासाठी अनेक तक्रारी केलेल्या होत्या तसेच वैध कार्यकारणी बाबत न्यायप्रविष्ठ बाबी असताना शिक्षण उपसंचालक कार्यालयापर्यंत राजकीय वजन वापरून आर्थिक रसद पुरविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बदलीचा रेट एक लाख?
सुत्रांकडून मिळालेले माहीतीच्या आधारे 13 शिक्षकांचे बदल्यांसाठी प्रस्ताव पाठविले होते यापैकी दहा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधि कारी यांनी संस्थेच्या वैध कार्यकारणी ( परिशिष्ट १ वर ) मार्फत आलेले नसल्याने बदली मान्यता प्रस्ताव फेटाळेले आहे . मात्र कोरोना काळात झालेल्या बदल्यांना शिक्षण उपसंचालक नाशिक कार्यालयाने ३ कनिष्ठ प्राध्यापकांच्या बदली मान्यतेच्या प्रस्तावाला आश्चर्यकाररीत्या सर्व कायदे , नियम, मे उच्च न्यायालयाचे आदेश ,तक्रारदार यांच्या कडे दुर्लक्ष करीत मंजुरी दिली असून या करिता लाख रुपयांपर्यंत शिक्षण उपसंचालक नाशिक यांचे कडे खर्च लागल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू असून हे प्रकरण अनेक सामाजिक संघटना तसेच लोक प्रतिनिधी यांनी गांभीर्याने घेतले असून याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार होणार असल्याने पुढील काळ हा शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्या करिता खडतर राहणार असल्याचे समजते