जळगाव प्रतिनिधी । जळगावात तरुणाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी धुमस्टाईल मोबाईल लांबविल्याची घटना १५ रोजी शुक्रवारच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सागरपार्क मैदानाजवळ बॅरिस्टर निकम चौकाकडून रामदास कॉलनीकडे शुभम दिलीप भिरुड वय 24 रा शिवराम नगर हा तरूण शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास वडील दिलीप श्रावण भिरुड व आई निता, भाऊ रुपेश या कुटुंबियासमवेत बॅरिस्टर निकम चौक ते रामदास कॉलनी रस्त्यावर शतपावली करीत होता. बॅरिस्टर निकम चौकात चालत असतांना, शुभमला त्याचा मावस भाऊ हर्षद याचा फोन आला आला.
त्याच्याशी मोबाईलवर बोलत असतांना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कानाला लावलेला मोबाईल हिसकावून नेला व रामदास कॉलनीकडे दोघे पसार झाले. शुभमसह त्याच्या भावाने दोघांचा पाठलाग केला. मात्र त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याप्रकरणी शुभम भिरुड याने तत्काळ रामानंद नगर पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली . त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी करीत आहेत.