Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

पूर्ण शिजवलेले चिकन व उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित

by Divya Jalgaon Team
January 16, 2021
in जळगाव, प्रशासन
0
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जळगाव – महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दुरध्वनी क्र. 0257-2958200/2262808 असा आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील यांनी दिली आहे.

जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या 30 टिम स्थापन करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करील आहे. पक्षी मालकांनी आपल्या कुक्कुट पक्षाचा स्थलांतरीत पक्षाशी संपर्क टाळावा. कुक्कुट पक्षात असाधारण मरतूक आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.

पूर्ण शिजवलेले चिकन व उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु आजार पक्षांपासून थेट माणसांना होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे बर्ड फ्ल्युबाबत नागरीकांनी भिती बाळगू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी केले आहे.

आपात परिस्थितीसाठी लागणारे पी. पी. ई किट, सॅनिटाईझर, मास्क, ग्लोज आदि साहित्य जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात कुठलीही आपात परिस्थिती हाताळण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: Collector OfficeJalgaonMarathi Newsबर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन
Previous Post

कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३५ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात आज ३५ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group