शिरसोली (अशोक पाटील) – तालुक्यात शिरस़ोली आज 15 जानेवारी रोजी सकाळपासून मतदान सुरळीत चालू झाले किरकोळ वाद वगळता मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदान केंद्रावर गदीँ झाली 3 नंबर वार्डमध्ये 5 वाजता गदीँ झाल्याने चिठ्या वाटप करण्यात आल्या होत्या.
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्याचे पोलीस उपधीक्षक यांनी भेट दिली. तसेच पोलीस उप अधीक्षक चंद्रकात गवळी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस कर्मचारी एकुण 19 पोलीस कर्मचारी होते व शिरसोली गावातील पोलीस पाटील श्रीक्रुष वराडे यांनी सहकार्य केले. गावात एकुण 77.52 टक्के मतदान झाले आहे.