मेष : हरहुन्नरीपणा दाखवून द्यावा. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
वृषभ : बोलण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. प्रवास मजेत घडेल. वाचनाची आवड भागवाल. वडिलांचा विरोध होऊ शकतो. आपल्या तरल बुद्धीचा वापर करावा.
मिथुन : जोडीदाराचे कौतुक करावे. विचारांना योग्य चालना द्यावी. भावंडांना मदत कराल. अचानक धनलाभ संभवतो. मुलांचे प्रश्न सावधगिरीने हाताळा.
कर्क : जोडीदाराची प्रगती अनुभवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जवळचा प्रवास घडेल. सहकुटुंब फिरण्याचा आनंद मिळेल. मनातील गैरसमज बाजूला सारावेत.
सिंह : इतरांचा विश्वास संपादन करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. नातेवाईकांना मदत करावी लागेल. कफाचे त्रास संभवतात. उगाचच भांडणात अडकू नका.
कन्या : लेखकांच्या कामाला वेग येईल. तुमच्यातील धाडस वाढेल. कौटुंबिक समाधान लाभेल. खर्च देखील काहीसा वाढेल. बोलता-बोलता शब्द देवू नका.
तूळ : रागावर नियंत्रण ठेवावे. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. आपले मत परखडपणे मांडाल. नवीन मित्र जोडाल.
वृश्चिक : तुमच्यातील उतावीळपणा वाढेल. सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. ज्ञान गोळा कराल. आपल्याकडची माहिती इतरांना द्याल. बोलतांना तोल जाऊ देवू नका.
धनू : गोड शब्दांनी सर्वांना जिंकाल. एखादे वाद्य शिकण्याची इच्छा होईल. कमिशनमधून चांगला लाभ होईल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका.
मकर : आपल्या बुद्धीचा सदुपयोग करावा. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी व्यक्तींना लाभ होईल. आपले मत चांगल्याप्रकारे मांडाल. बुद्धिचातुर्य दाखवावे.
कुंभ : महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मानसिक चंचलता जाणवेल. बढतीचे योग येतील. कामाच्या स्वरुपात बदल होईल. थोडे अधिक कष्ट पडण्याची शक्यता आहे.
मीन : मनातील इच्छा पूर्णत्त्वाला जातील. मित्रांची उत्तम साथ राहील. अभ्यासू लोकांच्यात वावराल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या ओळखी वाढतील.