नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. या बदलत्या दरांचा सामान्य माणसांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील बदल जाहीर करत असतात. त्यामुळे दररोज सामान्य माणसाचं लक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर असतं.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज (13 जानेवारी) पेट्रोल आणि डिशेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पाच दिवसांपूर्वीही सलग दोन दिवस पेट्रोलचा भाव वाढला होता. दिल्लीत पेट्रोल 25 पैशांनी महागलं आहे. तर मुंबईत पेट्रोलच्या दरात 24 पैशांची वाढ झाली आहे. कोलोकात्यात 44 पैसे आणि चेन्नईत 22 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या पेट्रोलचा दर 91 रुपयांच्या पार गेला आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव 84.45 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत 91.07 रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव 85.92 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईत 87.18 रुपये प्रति लीटर आहे.
मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर
– दिल्ली : 84.45 रुपये प्रति लीटर
– मुंबई : 91.07 रुपये प्रति लीटर
– कोलकाता : 85.92 रुपये प्रति लीटर
– चेन्नई : 87.18 रुपये प्रति लीटर
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol And Diesel Price Today).
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.