जळगाव – शहरातील भास्कर मार्केट येथील मनपाच्या मालकीचे खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानातील पुतळ्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे हेतुपुरस्सकर दुर्लक्ष असल्याचे काही युवकांना लक्षात आले. सदर प्रकार मा.आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिला असता त्यांनी हा गंभीर प्रकार गांभीर्याने घेतला नसल्याचे सदर युवकांना जाणवले.
उद्यानातील बहिणाबाईंच्या पुतळ्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. बहिणाबाईंनी घातलेला चष्मा तुटलेला आहे, पुतळ्यावर प्रचंड घान आहे तसेच अवतीभवती प्रचंड कचरा आहे. याने संबंध खानदेश वासियांचा अपमान होणे साहजिकच आहे.
त्यामुळे त्वरित या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पुतळ्याची दुरुस्ती व उद्यान सुशोभीकरण करण्यात यावे.तसेच निवेदनाची त्वरीत दखल न घेतल्यास २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनी तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर सागर चौधरी,भूषण महाजन,अक्षय पाटील, अरुण जाधव,अंकुश चव्हाण, शशिकांत चौधरी,राजेंद्र चौधरी, सचिन सोनवणे यांच्या सह्या आहेत.