रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात दोन जणांना जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात त्या चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
रावेर शहरातील नवीन रेस्ट हाऊसच्या मागील बाजूस आलेल्या आजंदा रोडवर अज्ञात पाच ते सहा जण हत्यार घेवून अंधारात उभे असल्याची माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोउनि शितलकुमार नाईक, सपोनि मनोहर जाधव, पो.ना. महेंद्र सुरवाडे, पो.कॉ. सुनील वंजारी, पो.कॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. सुरेश मेढे, पो.कॉ. कुणाल सोनवणे, पो.कॉ.सुकेश तडवी, पो.कॉ. विशाल पाटील, पो.कॉ. मंदार पाटील असे पथक तात्काळ पाठविले.
रावेर शहरात नवीन रेस्ट हाऊसच्या मागे अजंदा कडून व रावेरकडून असा ट्रॅप लावून गेले असता एकूण 6 संशयित इसम दिसून आले व ते पोलिसांना पाहून आजूबाजूला पळाले यात दोन जणांना अटक केली आहे.
शेख हसन शेख अनवर (वय-24) रा. रावेर फतेहनगर (लाल मिरची पूड), अब्दुल अकिल अब्दुल शकील (वय-२५) रा. रावेर हुसैनि मस्जिद जवळ (छोटा चाकु ) यांना अटक केली.
त्यांच्याकडून कुऱ्हाड, दोन कटावणी, एक सुती पांढरी दोरी, लाल ठिपके असलेली असे घटनास्थळावर दरोडा टाकण्याचे तयारीत असतानाचे साहित्य मिळून आले आहे. तर फरार झाले आरोपी आकाश लक्ष्मण रिल, शे बाबा शेख कलीम, शे अक्रम मिठाई शे मुसताक, तिबु उर्फ इस्माईलखान याकूब खान असल्याचे सांगितले. दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्या चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.