जळगाव प्रतिनिधी । जळगावातील मोहाडी रोडवरील खुबचंद टॉवरजवळील घराला अचानक आग लागल्याने लाखोंचा माल
जळगाव शहरातील मोहाडी रोड वरील खुबचंद साहित्य टॉवरमधील गोडाऊन आहे. शिवाजी मोहन अस्वार (बारी, वय. ३६) रा. रामेश्वर कॉलनी हे किरकोळ विक्रीचे व्यवसायिक आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कुरकुरे पाकिटांचा होलसेल व्यवसाय सुरू केला आहे.
यासाठी त्यांनी मोहाडी रोडवरील खूपचंद साहित्या टॉवर जवळ एक भाड्याने गोडावूनही घेतले आहे. काल १० रोजी त्यांनी सुमारे अडीच लाखांचा माल गोडावून मध्ये भरला होता. आज ११ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अचानक गोडावूनला आग लागल्याने कुरकुऱ्यांच्या पाकिटे जळून खाक झाली आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. महापालिकेचा एक बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली. याप्रकरणी पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु आहे.