लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याचे धमकी देण्याचा निनावी मेसेज पोलीस कंट्रोलरूममध्ये आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणानं पोलीस कंट्रोल रुम 112 च्या Whatsapp वर मेसेज केला आहे. 24 तासांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी दिली आहे. तर शोधू शकत असाल तर शोधून दाखवा असा पोलिसांना इशारा दिला आहे. या प्रकरणी रविवारी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात एफआय़आर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कंट्रोल रूम 112 वर शनिवारी रात्री 8.07 मिनिटांनी एक मेसेज आला होता. 8874028434 या नंबरवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 48 ते 24 तासांच्या आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. शोधू शकत असाल तर शोधून दाखवा असा इशारा देखील देण्यात आला होता.
या निनावी मेसेजनं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. धमकी देणारा व्यक्ती हा दुसऱ्या शहरातील असून त्याची मोबाईलनंबर द्वारे संपूर्ण माहिती काढण्यात आल्याचं डीसीपी साऊथ रवी कुमार यांनी सांगितलं आहे.