जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क येथील ३३ वर्षीय तरुणाची राहत्या घरातून गळफास घेतल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे.
मयत तरुणाचे पूर्ण नाव आरीफ खान रशीद खान (वय ३३) हे आहे. अनेक दिवसांपासून हाताला काम नसल्याने आरीफ तणावात होता असे नातेवाईकांनी सांगीतले. दरम्यान, दुपारी पती पत्नीत वाद झाला होता, हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर त्याने गळफास घेतला. आरीफ यास रात्री दहा वाजता त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासणी मयत घोषीत केले. आरीफखान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आई-वडील असा परिवार असून खासगी वाहनावर तो चालक म्हणुन कार्यरत होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.