जळगाव प्रतिनिधी । भादली बुद्रुक येथील रेल्वेगेटच्या विस्तारीकरणाचे काम करण्यात येत आहे. भादली बुद्रूक येथील रेल्वेगेट नंबर १५३ जवळील प्रस्तावित अंडरपासचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यात गेटजवळ भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असला तरी त्याचे काम अद्यापही प्रलंबीत आहे. यामुळे हा अंडरपास तातडीने पूर्ण करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केली आहे. या संदर्भात लालचंद पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक जिल्हा महामार्ग क्रमांक १८ला असलेले रेल्वेगेट १५३जवळ तिसर्या व चौथ्या रेल्वेलाइनच्या विस्तारीकरणामुळे रेल्वेने गेट कायमचे बंद केले आहे.
यामुळे शेतकरी, वाहनधारकांची प्रचंड गैरसोय वाढल्याने त्या गेटवर समांतर रस्ता तयार करुन दिला आहे. यासह छोट्या वाहनासाठी रेल्वेगेटवर १५३च्या जागी रेल्वे अंडर बायपास मंजूर केला असून त्यासाठी लागणारे अवजड साहित्य जागेवरच तयार केले आहेत. मार्च २०२०पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे उपमुख्य अभियंत्यांनी दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कुठलेही काम प्रत्यक्ष सुरू नसल्याने फेर्याने ये-जा करावी लागते. यामुळे शेतकर्यांना खूप त्रास होत आहे. यामुळे हा भुयारी मार्ग तातडीने तयार करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.