जळगाव, प्रतिनिधी । लेवा एज्युकेशन युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महािद्यालय मराठी विभाग आयोजित अथर्वे पब्लिकेशन जळगाव निर्मित आणि प्राचार्य डॉ. किसन पाटील लिखित ‘मराठी लोकरंगभुमी’ ग्रंथाचे प्रकाशन समारंभ मोठ्या दिमाखात करण्यात आला.
‘मराठी लोकरंगभूमी’ पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लेखक डॉ. किसन पाटील यांनी सांगितले की, मराठी लोकरंगभूमी संदर्भातील जे विविध घटक आहेत त्या घटकांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, विद्यार्थ्यांना लोकरंगभूमीचे जुने आयाम यांचा परिचय व्हावा या दृष्टीकोनातून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. लोकनाट्य, पथनाट्य, वही गायन, दशावतार, तमाशा, वारी व वारी संदर्भातील रिंगण नाट्य, आंबेडकरी व सत्यशोधक जलसे या सगळ्याचा परिचय या पुस्तकात देण्यात आला आहे. याप्रसंगी अथर्व पब्लिकेशन्सचे युवराज माळी, डॉ. सत्यजित साळवे, प्रा. दिपक पवार, प्रा. विनोद भालेराव, प्रा. वंदना नेमाडे आदी उपस्थित होते.