Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जकी उर रहमान लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in राष्ट्रीय
0
जकी उर रहमान लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

लाहोर: वृत्तसंस्था । मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी याला पाकिस्तान कोर्टाने १५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

याआधी शनिवारी लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. लखवीवर दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

लखवी हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर असून त्याचे हाफिझ सईदनंतर दहशतवादी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. लखवी मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणी २०१५ पासून जामिनावर आहे. त्याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाने अटक केली आहे. पंजाबच्या दहशतवाद विरोधी विभागाने गुप्त माहितीवर आधारित अभियानानंतर प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकी उर रहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले होते.

या अटकेमागे दहशतवादी फंडिंगच्या विरोधात काम करणारे जागतिक संघटन फायनॅन्शियल अॅक्शन टास्कफोर्सचा दबाव असल्याचेही मानले जात आहे. टेरर फंडिंगच्या विरोधातील पाकिस्तानची कारवाई पुरेशी नसल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. या संघटनेला ग्रे यादीत ठेवले असल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. पाकिस्तानने जर दहशतवादी फंडिंगविरोधात कारवाई केली नाही, तर त्याला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. या अंतर्गत पाकिस्तानला अनेक प्रकारच्या वित्तीय प्रतिबंधांना समोरे जावे लागणार आहे.

Share post
Tags: #LahorJaki Ur Rahman LakhvilaMarathi Newsजकी उर रहमान लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
Previous Post

९ जानेवारी रोजी एकादशीला मुक्ताबाई मंदिर राहणार बंद

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी रोखला

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी रोखला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी रोखला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group