चाळीसगाव प्रतिनिधी । येथील भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर आज प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली असून पूर्व वैमनस्यातून हे कृत घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग पाटील यांच्यावर आज पोलीस स्थानकातून बाहेर पडत असतांना प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ते जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला याची माहिती मिळाली नसली तरी पूर्व वैमनस्यातून हे कृत झाल्याचे समजते. जगदीश महाजन यांच्यासह इतरांनी हा हल्ला केल्याचे उघड झाले असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.