जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने गॅस दाहिनी बसविण्याचे काम पुर्ण झाले असून येत्या आठवडाभरात गॅस दाहिणीचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी दिली.
गेल्या सात महिन्यांपासून नेरी नाका स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवण्याचा कामाला सुरूवात झाली होती. आता या कामाला अंतिम स्वरूप आले आहे. भविष्यात या गॅस दाहिनीमुळे मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार करता येणार असून लाकूड व इतर इंधनाचा खर्च देखील वाचणार आहे.
जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मृतांची संख्यादेखील वाढत होते. जून महिन्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शहरात महानगरपालिकेच्या वतने विद्यूतदाहिनी बसविण्याच्या सुचनादेखील दिल्या होत्या. याकडे मात्र महापालिकेने दुर्लक्ष केले होते. दरम्यान तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड.सुचिता हाडा यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या सहकार्याने स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचा प्रयत्न दिला होता. केशवस्मृती प्रतिष्ठानने देखील मनपाच्या प्रस्तावाला मान्य करत कामाला सुरूवात केली होती. आरोग्यमंत्र्यांच्या सुचनेप्रमाणे केशवस्मृती प्रतिष्ठानने आवश्यक मशिनरी उपलब्ध करून दिली आता येत्या आठवड्यात हे काम पुर्ण होणार असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानेचे भरत अमळकर यांनी दिली.