सावदा प्रतिनिधी । येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाचे सचिव रवींद्र हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत सावदा पत्रकार संघाचे नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत संघाचे सदस्य दिवंगत पत्रकार सुरेश बेंडाळे याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत सन २०२०-२१ च्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली. यात अध्यक्षपदी शामकांत वसंत पाटील, उपाध्यक्ष प्रवीण रघुनाथ पाटील ,सचिव अनुमोदश्री तायडे सर तर कोषाध्यक्षपदी पंकज पाटील,संपर्क प्रमुख राजू दिपके, सल्लागार लाला कोष्टी, राजेंद्र भारंबे यांची सर्वांनूमते बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार लाला कोष्टी, श्याम पाटील, राजेंद्र भारंबे तसेच प्रवीण पाटील, अनोमदर्शी तायडे सर , रवींद्र हिवरकर, पंकज पाटील, कमलाकर पाटील, रोशन वाघुळदे, साजिद शेख़, राजेश पाटील, राजू दिपके, भारत हिवरे, अज्जु शेख़, पिंटू कुलकर्णी, मिलिंद टोके, मिलिंद कोरे या सदस्यांची बिनविरोध निवडण्यात आले. निवड झालेल्या कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.