जळगाव प्रतिनिधी । चित्रा चौकातील दुकानासमोरून मजूराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजता उघडकीला आली. अज्ञात चोरट्यांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी मालक शेख दगडू शेख बशीर सिकलीकर (वय-३२) रा. कानळदा ता.जि.जळगाव हा तरूण जळगाव शहरातील चित्रा चौकात असलेल्या कृष्णा ईलेक्ट्रिक दुकानावर मजूरीचे काम करतो. कामावर येण्यासाठी त्याच्याकडे दुचाकी (एमएच १९ सीए ८७६९) आहे.
कानळदा ते जळगावसाठी दुचाकीनेच अप-डाऊन करत असतो. नेहमीप्रमाणे ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कामावर आला. चिरमाडे एजन्सीच्या दुकानाच्या बाजूला दुचाकी लावली. काम आटोपून रात्री ८.३० वाजता घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आला असता दुचाकी दिसली नाही.
आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मिळून न आल्याने शहर पोलीस ठाणे गाठले. शख दगडू शेख बशीर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. गणेश पाटील करीत आहे.