पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील बाळद बु येथील ग्रामस्थांनी दाखवत मृत्युमुखी पडलेल्या वानराचे विधीवत अंत्यसंस्कार करुन एक आगळा वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे.
एकीकडे माणुस माणसाला होत नसल्याचे चित्र आपणास सर्वत्र बघावयास मिळते. परंतु वनप्राण्याविषयीची असलेली कृतज्ञता तालुक्यातील बाळद बु येथे दिसून आली. बाळद बु” ता. पाचोरा या गावा लगत रेल्वेलाईन असुन रेल्वे रुळावर एका रेल्वे खाली येवुन वानर राजा मृत्यूमुखी पडल्याची दुःखद घटना दि. ६ जानेवारी रोजी सकाळ सुमारास घडली. घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना कळल्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन मयत झालेल्या वानर राजाचे विधीवत अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले.
याकरिता आप आपल्या कुवतीनुसार लोक वर्गणी जमा केली. जमा झालेल्या पैशातुन वानराचे विधिवत पुजन ट्रॅक्टर फुल हारांनी सजवत वाजंत्री लावुन गावातुन अंत्ययात्रा काढण्यात आली. व गावा नजीकच वानर राजा याचे शव पुरण्यात आले. तसेच मानव जाती प्रमाणेच करण्यात येणाऱ्या दशक्रिया विधी व इतर विधी करून दुखवटा पाळणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. बाळद वासियांच्या या वनप्राण्याविषयीची आत्मीयता बघुन ग्रामस्थांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.