Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

by Divya Jalgaon Team
January 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी झाली. चौघे मिळून दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शहर पोलीस स्थानकाच्या आवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गेंदालाल मिल मध्ये राहणारे नाजीमखॉ कादिरखॉ पटवे, रिजवाना बी शेख आमीर, आबेदाबी, फरिनबी जुबेर खान यांनी मागील भांडणाच्या कारणावरून एक महिला आणि पुरूष यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी महिला व पुरूष शहर पोलीस ठाण्यात आले असता त्याचवेळी मारहाण करणारे चौघे देखील शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि पुन्हा पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात हजर असलेले कर्मचारी पोउनि अरूण सोनार, महिला सहाय्यक फौजदार संगिता खांडरे, मपोकॉ संगिता इंगळे, मनिषा चव्हाण यांनी सुरू असलेले भांडण सोडविले. पो.कॉ. भुषण पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नाजीमखॉ कादिरखॉ पटवे (वय-३०), फरिदाबी जुबेर खान (वय-३५) दोन्ही रा. गेंदालाल मिल, सिकंदर उस्मान खान (वय-३९), शोभा मुकेश पवार (वय-३५) दोन्ही रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र सोनार करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsजळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी
Previous Post

15 जानेवारी रोजी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी

Next Post

गळ्यावर व्रण दिसल्याने रोखले अंत्यसंस्कार, संशयास्पद मृत्यू

Next Post
गळ्यावर व्रण दिसल्याने रोखले अंत्यसंस्कार, संशयास्पद मृत्यू

गळ्यावर व्रण दिसल्याने रोखले अंत्यसंस्कार, संशयास्पद मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group