यावल ( रविंद्र आढाळे) – तालुक्यातील नावरे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक| निवडणुकीत माजी सरपंचासह पाच उमेदवार बिनविरोध निवडुन आले असुन हे गाव पारंपारीक काँग्रेसचा गढ मानला जातो निवडुन आलेल्या सर्व उमेदवारांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक व स्वागत करण्यात आले आहे .
यावल तालुक्यातील नावरे ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीत गावातील प्रभागातील निवडणुक ही बिनविरोध झाली असुन बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असे कार्यकर्ते व मागील दहा वर्ष सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे गावाला स्वच्छता अभियानात राष्ट्रपती पुरस्काराचे मान मिळुन देणारे समाधान धनसिंग पाटील, व त्यांच्या पत्नी सौ . उज्वला समाधान पाटील , सौ . प्रतिभा संदीप पाटील , चंद्रभागा मुरलीधर पाटील , दयाराम दौलत पाटील यांचा बिनविरोध निवडुण आलेल्या उमेदवारांमध्ये समावेश झाला असुन , सात उमेदवारांनी या निवडणुकीतुन आपली माघार घेतली असुन ,उर्वरीत दोन जागांसाठी दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे . बिनविरोध विजयी झालेल्या सर्व भावी सदस्यांचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , काँग्रेसचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , जिल्हा परिषद सदस्य रामदास गोडु पाटील , यावल सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग देवनाथ पाटील आदींनी त्यांच्या विजयाचे स्वागत केले आहे .