Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सांगवी बु गावातील आमदार निधीतुन झालेल्या गटारीचे बांधकाम अचानक बंद

by Divya Jalgaon Team
January 6, 2021
in जळगाव
0
सांगवी बु गावातील आमदार निधीतुन झालेल्या गटारीचे बांधकाम अचानक बंद

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील सांगवी बु गावातील आमदार निधीतुन गावाबाहेरील वस्तीतील मंजुर झालेल्या गटारींचे अर्धवट काम करून ठेकेदार झाला गायब नागरीकांच्या सांडपा अद्याप ही प्रलंबीत ग्रामस्थांमध्ये पंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

यावल तालुक्यातील सांगवी बु या गावात माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातुन या भास्कर नगर वस्तीमधील राहणाऱ्या ग्रामस्थांनी वारंवार आपल्या परिसरातील सांडपाण्याची समस्या दिवसंदिवस वाढल्याने अखेर या भागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्याने या प्रश्नाचा गांर्भीयांने विचार करून आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतुन पाच लाख रुपयांचा निधी मंजुर केला होता .

दरम्यान कामास तांत्रीक मंजुरी मिळाल्यानंतर ठेकेदाराने या परिसरात गटारी बांधकामास सुरुवात देखील केली होती मात्र माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांच्या अचानक झालेल्या अक्समात निधनाने संबधीत ठेकेदाराने अचानक या गटारीचे सुरू असलेले काम बंद केल्याने व ते काम अद्याप सुरू झाले नसल्याने परिसरातील राहणारे ग्रामस्थ हे चांगलेच अडचणी आले असुन अर्धवट गटारी बांधल्याने नागरीकांचा सांडपाण्या प्रश्न हा अधिक गंभीर बनला असुन , भास्करनगर परिसरात सांडपाण्याचे ठीकठीकाणी डबके सांचल्याने डासांचा उपद्रव वाढला असुन नागरीक हे आपल्या कुटुंबांच्या आरोग्याच्या विषयाला घेवुन अधिक चिंतेत दिसुन येत आहे .

दरम्यान माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांनी मंजुर केलेल्या गटारी बांधकामाच्यासाठीचे पाच लाख रुपयांच्या निधीचे नेमके काय झाले या प्रश्नाचे उत्तर मात्र सांगवी गावातील रहिवासी नागरीकांना स्थानिक लोकप्रतिनिधी पासुन तर यावल पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी यांची भेट घेवुन व सार्वजनिक बांधकाम विभाग यावल या ठीकाणी चक्करा मारून देखील त्या आमदार निधीतील गटारीच्या बांधकामाचे काय झाले याचे उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासकीय कामाबाबत नाराजीचे सुर निधत आहे .

Share post
Tags: #Ravindra Adhaale#SangviMarathi NewsYawalसांगवी बु गावातील आमदार निधीतुन झालेल्या गटारीचे बांधकाम अचानक बंद
Previous Post

यावल तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ

Next Post

आधार क्रमांक सीडिंगसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू राहणार

Next Post
आधार क्रमांक सीडिंगसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू राहणार

आधार क्रमांक सीडिंगसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group