यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यात शहर परिसरात वाळु माफीयाचा धुमाकुळ , महसुल प्रशासन निंद्रअवस्थेत महसुलच्या वरीष्ठ पातळीवर या अवैद्य मार्गाने वाळु वाहतुक करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे .
यावल तालुक्यात व ग्रामीण भागासह परिसरात वाळु माफीयाने आपले जाळे पसरविले असुन तालुक्यात व शहरात अनेक ठीकाणी अवैद्य मार्गाने उपसा करून साठवण करून ठेवलेल्या वाळुची छुप्या मार्गाने प्रतिदीन सुमारे २५ते ३० ट्रॅक्टरद्वारे अवैद्य मार्गाने वाळुची मोठया प्रमाणावर वाहतुक करण्यात येत असुन , या सर्व गैरकारभारावर स्थानीक महसुल प्रशासनाचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरीकांकडुन करण्यात येत असल्याची माहिती मिळत असुन या वाळु माफीयास प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राजकीय पुढाऱ्यांचा देखील पाठींबा मिळत असल्याचे बोलले जात असुन या अवैधरित्या परिसरातील नद्यांची व तापी नदीची वाळु उपसा करून बेकाद्याशीररित्या वाहतुक करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही व्हावी अशी मागणी निसर्गप्रेमींकडुन होत आहे