जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांना ‘मूकनायक’ तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार आज दि.5 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली प्रकाशित केलेल्या मूकनायक पाक्षिकास ‘शंभर वर्ष’ पूर्ण होत असल्याने शतकपूर्ती निमित्ताने पत्रकार संघ राज्यभरातील कर्तबगार पत्रकारांचे मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानीत करीत आहे.
तसेच दरवर्षी पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तींना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या निवड समितीने संघटनेचे प्रदेशाशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक पुरस्कारासाठी लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांची निवड केली आहे.असे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा दि.26 जानेवारी रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ठीक 10 वाजता होणार आहे.