जळगांव – जळगाव शहर महानगर पालिका जळगांव यांच्या तर्फे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता प्रभागातील नागरिकांच्या मदतीस धावून निःस्वार्थ पने मदत कार्य केले त्या बद्दल सहायक आयुक्त पवन पाटील,महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके यांच्या हस्ते प्रभाग समिती सदस्य रवींद्र (बंटी) नेरपगारे व विठ्ठल पाटील यांना कोरोना कोरोना यौध्दा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शुचिता हाडा मा. स्थायी समिती सभापती,प्रतिभा पाटील प्रभाग समिती सभापती, सुरेखा तायडे नगरसेविका, महेंद्र पवार शहर समन्वयक म.न.पा. ई. उपस्थित होते.