Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील सुप्रीम कॉलनीत अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी

by Divya Jalgaon Team
January 3, 2021
in जळगाव
0
जळगावातील सुप्रीम कॉलनीत अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील सुप्रीम कॉलनीत नवीन जलकुंभ आणि पाण्याची टाकी तयार करण्यात येत असून पंप हाऊसचे काम अंतीम टप्प्यात आहे. शनिवारी २ जानेवारीला सायंकाळी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली असता दीड महिन्यात काम पूर्ण होऊन नागरिकांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा होणार आहे.

सुप्रिम कॉलनी अमृत योजनेंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची आणि पंप हाऊसच्या कामाचा महापौर गेल्या अनेक महिन्यांपासून आढावा घेत आहे. शनिवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, निता सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, सुरेश भापसे, दिलीप सोनवणे, संजय विसपुते, वाहिद खान, आदिल शाह यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता पंप हाऊसचा स्लॅब उघडण्यास ८ दिवसांचा कालावधी असून टाकीला तसेच पंप हाऊसचे आतून-बाहेरून प्लॅस्टर करण्यास किमान महिनाभर वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंप हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी विद्युत मोटार बसविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागतील अशी माहिती मक्तेदाराने दिली.

सुप्रीम कॉलनी परिसरात अनेक घरांना पिण्याच्या पाण्याचे संयोजन नसून काही ठिकाणी अवैध नळ संयोजन आहेत. नवीन टाकीवरून अमृत योजनेची जोडणी करण्यात आली असून त्याद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी नवीन नळ संयोजन लवकरात लवकर घ्यावे आणि भविष्यातील त्रास टाळावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

 

Share post
Tags: #Marathi newsxJalgaonजळगावातील सुप्रीम कॉलनीत अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी
Previous Post

उद्या पोलीस मुख्यालयात फळे, भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन

Next Post

पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Next Post
पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group