Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग्लोबल हॉस्पिटल उद्यापासून जळगाव जिल्ह्याच्या सेवेत

तज्ज्ञ डॉक्टरांचे "टेलीकॉलिंग" मार्गदर्शन ठरणार रुग्णांसाठी वरदान ; उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

by Divya Jalgaon Team
October 13, 2020
in जळगाव
0
today news

जळगाव (प्रतिनिधी) : ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, जामनेर येथे टेलीमेडिसीन, टेली कन्सल्टींग, टेली ऑपरेटिंग, लाईव्ह cme अशा प्रकारे अद्ययावत सुविधांनी हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. या हॉस्पिटलचे उदघाटन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या दि. १३ ऑक्टोबर रोजी होत आहे.

यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. माजी मंत्री, गिरीश महाजन यांचे मतदारसंघातील नागरिकांना व जिल्हा वासियांना उत्तम आरोग्य सुविधा योग्य व सवलतीच्या दरात पुरविण्याचे स्वप्न यामुळे पूर्ण होत आहे.

या रुग्णालयामध्ये मनुष्यबळ पुरविण्याचे काम नामांकित बीव्हीजी ग्रुप यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. सदर रुग्णालय हे मुंबई पुण्याच्या धर्तीवर अद्यावत सेवेने सुरू करण्यात येत आहे. ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्यावत मशीन, पॅथॉलॉजी, एक्स-रे-सोनोग्राफी, सिटीस्कॅन, डायलिसीस मशिन, कँसर उपचारासह चाळीस वेळ आयसीयू तसेच चार मॉडेल रोटी 20 वेंटीलेटर 10 सेमी व्हिटेलेटर 200 ओ.टु बेड सर्व प्रकारचे तपासणी कक्ष राहणार आहेत. स्पेशल, जनरल, रिकवरी अशा खोल्या असलेले विविध प्रकारचे वोर्ड या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येत आहेत.

तसेच मुंबई-पुणे येथील डॉक्टर्स जामनेर येथे येऊन काही रुग्णांवर ऑपरेशन करून या भागातील डॉक्टरांना अद्यावत करण्याबाबत लाईव्ह ऑपरेशन म्हणजे cme यांच्यामार्फत शिक्षण देणार आहेत. तसेच शस्त्रक्रिया सुरू असताना एखाद्या डॉक्टरला काही अडचण आल्यास लाईव्ह टेली ऑपरेटिंगची सुद्धा मदत मिळेल.

पुणे आणि मुंबई किंवा इतर भागातील तज्ञ लोकांची सेवा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. डायलिसिस विभागामध्ये मुंबई-पुण्यासारख्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली डायलिसिस होणार आहेत. केमो थेरपी व कर्करोग शस्त्रक्रिया करता येणार आहेत. सर्व प्रकारच्या अद्यावत मशीन उपलब्ध आहेत.

नवजात शिशु बालकांसाठी एनआयसी व पीआयसीयु अद्यावत सुरू करण्यात येत आहे. पॅथॉलॉजिकल विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन तसेच अद्ययावत अशा प्रकारची सुविधा या रुग्णालयात सुरू करण्यात येत आहे. ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जामनेर येथे अद्यावत मशिनरीद्वारे तपासणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. शंभर ऑक्सिजन बेडचे कोविड 19 रुग्णालय सुरू करण्यात येत आहे.

Share post
Tags: Global HospitalJalgaon DistrictJamner
Previous Post

ऊर्जा विभागाच्या जिल्ह्यातील प्रलंबित कामांसाठी मंत्रालयात घेणार स्वतंत्र बैठक

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची उत्सव योजना

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची उत्सव योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group