जळगाव, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग व रेडप्लस रक्तपेढीची टीम च्या सौजन्याने दि.1 जानेवारी 2021रोजी सकाळी 10 वाजता कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस.चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, विलाससिंग राजपूत, पत्रकार संघांचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसकडा,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कोरोना योद्धा म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्यशासनाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार संघाने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
यावेळी रेडप्लस रक्तपेढीचे डॉ. भरत गायकवाड, डॉ. सुरज पाटील पत्रकार संघांचे खान्देश विभाग उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले,जिल्हाकार्यध्यक्ष शरद कुलकर्णी,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील,कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, जिल्हा संघटक भगवान मराठे,ग्रामीण कार्यध्यक्ष दीपक सपकाळे,महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख,महानगराध्यक्ष कमलेश देवरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे, संजय तांबे, मुकेश जोशी जिल्ह्या सहसंघटक चेतन निंबोळकर,महानगर कार्यध्यक्ष रितेश माळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे, अबरार मिर्झा, प्रमोद पवार, चेतन महाजन,प्रल्हाद पवार, गणेश रावळ,जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील सोनवणे यांचे सहकार्य लाभले आहे.