जळगाव- जेईई अँडव्हॉन्स परीक्षेत नेत्रदिपक यश पटकावून जळगाव जिल्ह्याचे नाव देश पातळीवर उंचावणाऱ्या संयुक्ता नंदकिशोर पाटील हिचा पालकांसह सत्कार राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था, श्री राजपूत करणी सेनेतर्फे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाधिकारी भा.वि.अकलाडे आणि संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन महाविद्यालयाची विद्यार्थिनी संयुक्ता पाटील हिने सप्टेंबर 2020 मध्ये दिलेल्या जेईई अँडव्हॉन्स परीक्षेत 292 गुण मिळवून कॉमन रँक लिस्टमध्ये संपूर्ण भारतातून 158 वा क्रमांक पटकावला आहे. संयुक्ता हिने हा क्रमांक निवड झालेल्या एकूण 43 हजार विद्याथ्यांमधून प्राप्त केला. या विद्यार्थिनीचे वडील नंदकिशोर पाटील हे छबी इलेक्ट्रीक्समध्ये असिस्टंट मँनेजर पदी कार्यरत आहेत. तर आई शुभांगी पाटील गु्हिणी असून त्यांचाही सत्कार करण्यात आला.शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्ता हिचे कौतुक केले.
या वेळी उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, विजय पवार, माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी एजाज शेख, शिक्षक प्रवीण पाटील, शीतल जडे आदी उपस्थित होते. या उपक्रमाला साई गु्पचे व्यवस्थापक प्रवीणसिंह पाटील, गौरी उद्योग समूह व मराठा कुणबी पाटील समाज वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.
अजून वाचा
खाजगी रुग्णालयाच्या बिलांचे शासकीय लेखा परिक्षण करावे- मालपुरे