अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मारवड येथील पेट्रोल पंपावर अज्ञाताने डिझेलची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मारवड येथील साईलिला पेट्रोलियम हा विजय अशोक इंडाईत (वय-३२) रा. भोरटेक ता.अमळनेर यांचा मालकीचा आहे. २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १ लाख २७ हजार रूपये किंमतीचे १ हजार ६०० लिटर डिझेल टाकीच्या डिप रॉडमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या मदतीने काढून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला.
याप्रकरणी विजय इंडाईत यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि वैभव पेठेकर करीत आहे.