मेष : अपेक्षित पत्रे हाती पडतील. छोटे प्रवास कराल. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचादिवस अनुकूल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील.
वृषभ : भावंडाचे सहकार्य लाभेल. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनाजोगे काम मिळेल.
मिथुन : मानसिक स्थैर्य लाभेल. महत्वाची कामे मार्गी लागतील. आजचा दिवस खरेदीसाठी अनुकूल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
कर्क : आपण घेतलेले निर्णय सभोवतालच्या व्यक्तींना पटतीलच असे नाही. अनेपक्षितगाठभेटी घडतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल.
सिंह : मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. इच्छापूती होईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या : वरिष्ठ आपल्या आवडीच्या कामाची जबाबदारी देतील. महत्वाची कामे मार्गी लागतील. आपली कर्तव्ये पार पाडाल. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल.
तूळ : जोडीदाराची प्रगतीकारक घटना कानी येईल. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकुल. छोटे प्रवास कराल. व्यापार-व्यवसायात नफा होईल. तात्पुरत्या स्वरुपात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या व्यक्तींची भेट होईल.
वृश्चिक : व्यवसायातील महत्वाचे निर्णय टाळावेत. संततीसंबंधी एखादी सुवार्ता कानी येईल. कुटुंबातील व्यक्तीला योग्य सल्ला दिल्यामुळे घरात आपले महत्व वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते.
धनु : व्यावसायिक उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. आज आपल्याला वैवाहिक सौख्य लाभेल. सामाजिक कार्याबद्दल समाजात मान मिळेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. गृहउद्योगातून लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर : आपल्या आरोग्याच्या तक्रारी राहतील. आपल्याला शत्रुपीडा जाणवेल. महत्वाची कामे टाळावीत. स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याकरीता सतत प्रयत्नशील राहाल. आपले मनोधैर्य वाढेल.
कुंभ : संततीच्या उत्कर्षाच्या सुवार्ता कानी येईल. नोकरीत आपल्याला महत्व प्राप्त होईल. अचानक विविध लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय उद्योगातील जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल.
मीन : आजचा दिवस वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल. कुटुंबात लागणाऱ्या महत्वाच्या वस्तूची खरेदी कराल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रगतिपथावर मार्गक्रमण करण्यासाठी नवीन योजनांची आखणी केली जाईल.