जळगाव – आज दिनांक 26 12 2020 रोज शनिवारी जळगाव तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघा ची नूतन कार्यकारणी निवड प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेसाठी जिल्हा संघाचे गोपाल लक्ष्मण पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ही सभा संघाचे अध्यक्ष माननीय खंबायत सर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सी डी पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत निवडणूक न होता बिनविरोध पणे सर्व कार्यकारिणी निवडण्यात आली.
निवडून आलेली नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- जळगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र रामभाऊ खोरखेडे, जिजामाता माध्यमिक विद्यालय हरीविठ्ठल नगर उपाध्यक्ष प्रशांत रमेश गरुड, विटनेर हायस्कूल सचिव प्रमोद पुंडलिक कोल्हे, बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली सदस्य विजय मुरलीधर गिरनारे, शारदा माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी जळगाव अनिल जगन्नाथ नारखेडे, विकास विद्यालय जळगाव खुर्द महिला प्रतिनिधी विद्या सुधाकर खाचणे, सार्वजनिक विद्यालय असोदा यांची बिनविरोध निवड झाली. या सभेचे सूत्रसंचालन सचिव खोरखेडे यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले. सर्व नूतन कार्यकारिणीचे जळगाव तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघामार्फत व सर्व मुख्याध्यापकांमार्फत हार्दिक अभिनंदन.