जळगाव – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “Student Unit Of Microbiologist Society” चे online ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रमुख व्याख्याते डॉ. अरविंद एम. देशमुख सर, President of Microbiologist Society, India. आणि डॉ. संजीव डी. पाटणकर सर, President of Microbiologist Society, Maharashtra. म्हणून लाभले. या प्रसंगी पाटणकर सर यांनी विद्यार्थ्यांना Student Unit बद्दल माहिती दिली आणि सूक्ष्मजीव शास्त्र विषयातील व्याप्ती बद्दल प्रोत्साहन केले.
डॉ. देशमुख सर यांनीहि विद्यार्थ्यांना सुक्षमजीवशास्त्र विषयातील व्याप्ती बद्दल माहिती दिली. शाश्वत विकासाबद्दल विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण मार्गदर्शन केले यात त्यांनी biofertilizer , Biopesticides इ. बाबत माहिती दिली. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.त्यांनी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या ‘गांडूळ खत निर्मिती’ प्रकल्पाचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले.
सदर प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. आर. बी. वाघुळदे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास सुक्षमजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वर्षा आठे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सायली नारखेडे यांनी केले तर आभार प्रा.कोमल पाटील यांनी व्यक्त केले.