जळगाव – जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी ९४% रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आज १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४८ हजार ९३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०३ % वर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ८६२ ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी १ हजार २५५ रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १ हजार ४०३ रुग्ण हे लक्षणे नसलेले तर अवघे ४५९ रुग्ण हे लक्षणे असलेले असून यापैकी १८९ रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहेत तर ७४ रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये १४७ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २५६, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये २०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात २०२ रुग्ण आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्य:परिस्थितीमध्ये जिल्ह्यात १२ हजार ८५४ बेड असून त्यापैकी २ हजार १९ ऑक्सिजनयुक्त बेड असून ३२२ आयसीयु बेडचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी नागरीकांनी बेसावध न राहता शासनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क हीच कोरोनाची लस आहे असे गृहीत धरुन घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सामाजिक अंतर राखावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनेटायझरचा वापर करावा. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
अजून वाचा
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये कोरोना चाचण्यामध्ये १८% घट


