गल्ली-बोळ्यात चालतात आंदोलन
कारण, सरकार यावे शरण
शिक्षक जातात आंदोलनावर
विद्यार्थी मात्र वाऱ्यावर
आमच्या मागण्या करा पूर्ण
ओरडून ओरडून घसा जीर्ण
विनाअनुदानित काम करणारे शिक्षक
तळमळीने करतात तकतक
सरकार धरतय ताणुन
आम्ही पैसा आणणार कोठून
१८-२० वर्ष काम करताय जे विनाअनुदानित
त्यांचा सरकारला प्रश्न झणझणीत
आशेवर करताय विनाअनुदानित काम
वाट पाहणारं, पण नाही ठोकणार राम राम
भावी शिक्षकांच काय होणार
सारेच ओरडतात, सरकार सरकार
२१ मार्च २०१९ बैठक, आयुक्त कार्यालय
काही तुकड्यांना दिले अनुदान त्या पत्रात
सदरचे प्रस्ताव, विभाग स्तरापर्यत तयार करावे
शिक्षकांचे म्हणने, मागणे आमचे पुर्ण करावे
वित्तविभाग करणार आता तपासणी
तेव्हाच पुर्ण होणार मागणी
अपात्र शाळेला जो दर्शवेल पात्र
त्या शिक्षकावर चालू कायद्याचे सत्र
पण माझे केवळ एकच म्हणने
प्रामाणिकपणे शिक्षकाने शिकवणे
घडवावे चांगले विद्यार्थी
त्यांचे भविष्य व्हावे सारथी
कवी- दिशा दिनेश पाटील,
स्वामी समर्थ विद्यालय, आव्हाने शिवार, जळगाव