निपाणे ता. एरंडोल – येथे आंतरजातीय विवाह धुमधडाक्यात संपन्न झाला .या विवाहातील वर चि. भूषण हे निपाणे येथील पंचवीस वर्ष बिनविरोध सरपंच राहिलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या ज्वारी पीक स्पर्धेत सतत तीन वर्षे प्रथम पारितोषिक प्राप्त शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले परिसरातील जिभाऊ नावाने नामांकित कै. पितांबर लोटन पाटील यांचे नातू अर्थात सौ प्रतिभा व प्रकाश पितांबर पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून त्यांचा समावेश ओबीसी ( इतर मागास वर्ग ) या वर्गवारीत येतो . तर वधु ही दिंडोरी तालुक्याचे भाजपा पक्षाचे दोन टर्म तालुका अध्यक्ष तसेच दिंडोरी तालुक्यातील दक्षता समितीवर सदस्य असलेल्या श्री राजाराम किसन बस्ते यांची द्वितीय कन्या असून वधूचा समावेश अनुसूचित जमाती या वर्गवारीत येतो .
सदर विवाहप्रसंगी असंघटित कामगार विभाग , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रदेश सचिव डॉ. राजेंद्र संदांशिव त्याचप्रमाणे वणी येथील शेतीनिष्ठ शेतकरी व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात पारंगत श्री दत्तू घाडगे , महाराष्ट्र राज्य चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर , समाजातील अविवाहित वर – वधूंचे विवाह घडवून आणनेसह विधवा परितक्ता घटस्फोटीत यांचे पुनर्विवाह तसेच विवाहित परंतु वादग्रस्त कुटुंबातील वाद सामंजस्याने मिटवत त्यांना कौटुंबिक जीवनाकडे वळविण्याचे सामाजिक कार्य करीत असल्याच्या अनुषंगाने राज्य आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले व खान्देशी मराठा पूनरविवाह ग्टप चालक , मा , अधिक्षक जि , प ज ळगांवबापू सो भास्कर राव नाना पाटील , [ जानवे कर] ( समाजभूषण पुरस्कार प्राप्त कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब सुमित पाटील सर ) ( दादासाहेब किशोर पाटील सर कुणबी मराठा वधुवर ग्रुप ग्रुप चे उपाध्यक्ष जळगाव) भारतीय सुरक्षा रक्षक युनियनचे अध्यक्ष सोमा संतोष कढरे , राष्ट्रीय किसान मोर्चा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे , एरंडोल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . विवाह प्रसंगी गावरानी जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव पाटील यांनी आपली भूमिका मांडताना विवाह उत्सुक भूषण हे माझे भाचे आहेत असे सांगत भारत हा शेतीप्रधान देश नसून आजरोजी जाती प्रधान देश झालेला आहे असे सांगत इसवीसनपूर्व 563 पासून ते पाचव्या शतकातील शंकराचार्यांच्या माध्यमातून जातीव्यवस्थेची निर्मिती व तद्नंतर बाराव्या शतकातील संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या वारकरी चळवळीच्या माध्यमातून जाती व्यवस्थेला सुरुंग लावण्यापासून पासून ते सोळाव्या शतकातील जगद्गुरु तुकोबांच्या वारकरी आंदोलनाचे फळ म्हणजे छत्रपती शिवरायांची जात विरहित समाजव्यवस्था त्याचप्रमाणे भारतीय संविधानिक तरतुदींन्वये संविधानाच्या माध्यमातून जातिव्यवस्था संपवण्यासाठी कशापद्धतीने क्रांती व प्रतिक्रांती झालेली आहे ही बाब उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत आमची नाळ कृषी संस्कृतीशी जोडलेली असल्याने जाती व्यवस्थेला पूर्णविराम देण्याची गरज आहे अशी स्पष्ट भूमिका मांडली .
या विवाह प्रसंगी मुरार जगदेव यांनी फाटकी चप्पल व तुटकी केरसुनी बांधलेली लोखंडी पहार उपटत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी शिवबाच्या हाती सोन्याचा नांगर देत भूमि नांगरून काढणे व तेथे मानव वस्ती निर्माण करणारी विज्ञानवादी , निर्भयतेची प्रेरणा देणारी प्रेरणा प्रतिमा व कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक भेट देत मान्यवरांचा वधू वराचे आई-वडीलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . या विवाहात कन्या ही दान देण्याची वस्तू नसून कन्यादानाचा नव्हेतर कन्या सन्मानाचा कार्यक्रम होईल असे सांगत कन्यादान कार्यक्रमाला देखील फाटा देण्यात आला .त्याचप्रमाणे वधू-वर यांनी विवाह प्रसंगी मंचावर रूढी व परंपरेप्रमाणे उभे राहतांना विवाह प्रसंगी उपस्थितांकडे पाठ येणार नाही अश्या पद्धतीने उभे करत विवाह मंचावर मामा ऐवजी वधू-वरांचे आई वडील यांना वधू-वरांच्या शेजारी सन्मानाने बसविण्यात आले . सदरील आगळ्यावेगळ्या पद्धतीच्या विवाहाविषयी उपस्थितांमध्ये असेच विवाह घडवून आणण्याची गरज आहे या बाबीवर चर्चा होतांना दिसून आली .