नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीम इंडियाचा नवे निवडकर्ता अभय कुरुविला अडचणीत येऊ शकतात. नुकताच अभय कुरुविला यांची भारतीय वरिष्ठ संघाच्या निवड समितीत निवड झाली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज कुरुविला यांच्यावर हितसंबंधाचा संघर्ष केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरूद्ध मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. गुुुप्ता यांनी म्हटले की, कुरुविलाचा स्वारस्याचा संघर्ष त्यांच्या दोन भूमिकांमुळे आहे, एक डी वाय. पाटील अकादमीचे क्रीडा संचालक तसेच राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून.
भारतासाठी 10 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळणारे कुरुविला माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला पराभूत करून निवडकर्ता बनले आहे. बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) बैठकीत आगरकर आणि कुरूविला यांच्या नावांवर बराच काळ चर्चा झाली पण आगरकर यांचा पराभव झाला. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रानुसार, आगरकर यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कधीही समर्थन नव्हते. मुंबईचे मुख्य निवडकर्ता म्हणून त्याने सामने पाहिले नाहीत असा आरोप होता.
चेतन शर्मा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडक
अभय कुरुविलाशिवाय देवाशीष मोहंती आणि चेतन शर्मा यांचीही टीम इंडियाच्या निवड समितीत निवड झाली आहे. निवड समितीत कसोटी सामने खेळण्याचा सर्वाधिक अनुभव असलेल्या चेतन शर्माा यांची मुख्य निवड समितीची निवड करण्यात आली आहे. 54 वर्षीय चेतन शर्माने भारताकडून 23 कसोटी आणि 65 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाच्या नवीन निवड समितीचा कार्यकाळ इंग्लंड मालिकेपासून सुरू होईल. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवडकर्ते इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी, पाच टी -20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघ निवडतील.