Tuesday, April 7, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

संसदेत बैलगाडा शर्यतबाबत सातत्याने पाठपुरावा चालू – खा. डॉ. अमोल कोल्हे

by Divya Jalgaon Team
December 27, 2020
in राज्य
0
संसदेत बैलगाडा शर्यतबाबत सातत्याने पाठपुरावा चालू – खा. डॉ. अमोल कोल्हे

जुन्नर, आंबेगाव, खेड (प्रशांत पवार) – तसेच हवेली तालुक्यातील बैलगाडा मालकांनी आज दिनांक २६ रोजी खासदार डॉ अमोल कोल्हे यांची भेट घेतली. बैलगाडा शर्यत तात्काळ सुरू करावी यासाठी बैलगाडा मालकांचे सुमारे चाळीस जणांचे शिष्टमंडळ आज खासदार डॉ अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयात आले होते.

यावेळी खासदार डॉ कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती साठी आपण संसदेत वेळोवेळी मुद्दे उपस्थित करत आहोत असे सांगितले. तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे जलीकट्टू या स्पर्धेला परवानगी आहे त्याच पद्धतीने चारशे वर्षाची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती ला परवानगी मिळावी अशी मागणी आपण संसदेत वारंवार करत आहोत. गोवंश रक्षण करण्याचा बनाव करणाऱ्या भाजप सरकारला आपण गोवंशाचे किती नुकसान हत आहे, हे सविस्तर दाखवून देणार आहोत.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे, बैलगाडा मालक बाळासाहेब आरुडे, बाळासाहेब चव्हाण,  राकेश खैरे,  प्रकाश कबाडी,  रमेश डोंगरे,  समीर वाजगे, राजुशेठ चव्हाण, विजू गायकवाड, के के थोरात, सुरेश मातेले, विकास नायकवडी,  अप्पा जाधवर, जानकू डावखर, सोमनाथ डुंबरे, मयूर वाबळे,  अजित नेहरकर,  गिरीश आवटी, शांताराम अभंग, अजिंक्य सोमवंशी आदी बैलगाडा मालक व गाडाशौकीन उपस्थित होते. यावेळी एका बैलगाडा मालकाच्या मुलाच्या वाढदिवसाचा केक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थिती मध्ये कापण्यात आला.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर काही बैलगाडा मालकांनी, “बैलगाडावाल्यांना तुम्ही पहिला जीव लावा. आम्ही सांगतो की, तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या जीवावर पुन्हा खासदार व्हाल, आम्हाला रस्ते नको, सन्मान नको मात्र बैलगाडा शर्यत पाहिजे. अशी मागणी काही बैलगाडा मालकांनी केली. यावर खासदार डॉ कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीविषयी न्यायालयीन प्रक्रिया, पेटा संघटना, याबाबत माहिती देऊन बैलगाडा शर्यती लवकरात लवकर कशा सुरू होती याबाबत माहिती दिली

Share post
Tags: #Junner#MP Amol KolheMarathi NewsPuneसंसदेत बैलगाडा शर्यतबाबत सातत्याने पाठपुरावा चालू – खा. डॉ. अमोल कोल्हे
Previous Post

उंटावद येथील ओंकारेश्वर मंदीरात अखंड हरीनाम संकिर्तन सोहळ्याचे आयोजन

Next Post

आजचे पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा बदल

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

आजचे पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठा बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group