Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कगिसो रबाडा याने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

by Divya Jalgaon Team
October 20, 2020
in क्रीडा
0
sport news

नवी दिल्ली | आयपीएलच्या १३व्या पर्वात अनेक खेळाडू आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे यावेळी अनेक क्रीडा रसिकही आयपीएल पाहण्यास जास्त उत्सुक दिसत आहेत. या पर्वात अनेक युवा खेळाडू क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंवर मात करताना दिसत आहेत. रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे जलद गोलंदाज कगिसो रबाडा रचला नवा इतिहास. याने शानदार खेळ दाखवत संघासाठी विजयाची भूमिका पार पडली. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कगिसो रबाडा याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच थक्क केले. याच गोलंदाजीच्या बळावर कगिसो रबाडा याने आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

एवढेच नाही तर दिल्ली कॅपिटल्स संघासाठी ५० बळी घेणारा कगीसो हा पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला आहे. रबाडा याच्या गोलंदाजीवर सीएसकेचे डुप्लेसी हे खेळत होते, यातच त्याच्या चेंडूवर शिखर धवन यानं झेल घेतला. हाच रबाडा याचा ५० वा बळी ठरला.

कगिसो रबाडा याने सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० बळी घेण्याचा पहिला विक्रम केला आहे. पण याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० बळी घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० बळी घेण्याच्या बाबतीत रबाडा यानं सुनील नरेन यालाही मागे टाकलं आहे. सुनील नरेन याने ३२ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले होते आणि यात तो पहिल्या स्थानावर होता.

पण कगिसो रबाडा याने फक्त २७ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले आहे. या यादीत जलद गोलंदाज लसिथ मलिंगा याने ३३ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले होते. इमरान ताहिर हा चौथ्या क्रमांकावर असून त्याने ३५ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले आहेत.

पाचव्या क्रमांकावरील मिचेल मॅकलेघन याने ३६ सामन्यांमध्ये तर अमित मिश्रा याने ३७ सामन्यांमध्ये ५० बळी घेतले आहेत. त्याचबरोबर कगिसो रबाडा याने सर्वात कमी चेंडूत ५० बळी घेण्याच्या बाबतही पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लसिथ मलिंगा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७४९ चेंडूत ५० बळी घेतले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सुनील नरेन असून त्याने ५० बळी ७६० चेंडूत घेतल्या आहेत.

अजून वाचा 

IPL 2020 : शिखरच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्सचा विजय

Share post
Tags: IPL NewsMarathi NewsNew DelhiSport News
Previous Post

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

Next Post

महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये कोरोना चाचण्यामध्ये १८% घट

Next Post
दिलासादायक ! देशात २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१ जण करोनामुक्त

महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये कोरोना चाचण्यामध्ये १८% घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group