Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्य सरकारची दिशाभूल करत खटोड बंधूंनी केला ३० कोटींचा घोटाळा

by Divya Jalgaon Team
December 25, 2020
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
राज्य सरकारची दिशाभूल करत खटोड बंधूंनी केला ३० कोटींचा घोटाळा

जळगाव- काही दिवसांपूर्वी महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक असलेले  श्रीकांत आणि श्रीराम खटोड यांनी  सुभाष चौक अर्बन सहकारी पतपेढीतून बनावट कागदपत्रे दाखवून कर्ज घेतल्याची  तक्रार केल्याने प्रचंड  खळबळ उडाली आहे.

याच पाश्र्वभूमीवर आज अजय लालवणी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, राज्य सरकारची दिशाभूल करताना महसूल खाते आणि महापालिकेतील चेले -चपाटे हाताशी धरून श्रीकांत खटोड आणि बंधूंनी मेहरूण मधील खुल्या भूखंडाच्या बांधकामाचा ३० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

याप्रसंगी अजय ललवाणी व सरीत सरकार पुढे म्हणाले की , कोणताही लेआउट तयार करताना त्यावेळच्या ( सन- १९७३ ) शासकीय नियमानुसार १५ टक्के खुली जागा सोडणे कायदेशीर बंधनकारक असताना येथील बांधकाम व्यवसायिक श्रीराम व श्रीकांत खटोड या बंधूंनी शिरसोली रोडवरील रहिवासी असलेल्यांचे वापराची हक्काची जागा लाटून अनधिकृत बांधकाम करीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार धाकदपटशा व राजकिय वजन वापरून केला आहे.

तसेच शिरसोली रस्त्यावर असलेली संबंधित ( सर्व्हे न ४१३ मधील आरक्षण क्रमांक १४५ ) जागा १९७३ ते २००८ दरम्यान नगरपालिकेची ओपन स्पेस म्हणून वापरात होती. शासन नियमानुसार बारा वर्षे कब्जे वहिवाटीत जागा असली तर त्या जागेचे स्वामित्व वहिवाटदारांच्या हक्कांच्या आपोआपच बहाल होते. असे असताना जागेचा उतारा मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या नावावर होता. तो परस्पर बेकायदेशीरपणे बदलविण्यात आला. तो बदलताना शासनाची परवानगी, महापालिकेचा ठराव हे न करता दिनेश गजानन जोशी यांच्या नावे करण्यात आला. त्यातून खरेदी खताद्वारे श्रीराम, श्रीकांत खटोड व राम सहाय शर्मा यांच्या नावे वर्ग करण्यात आला.

शासनाच्या नगरविकास विभागाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व नगर विकास खात्याचे कार्यासन अधिकारी प्रणव कर्पे यांनी २३ नोव्हेंबर २०२० रोजी मेहरुण शिवारातील या खुल्या जागेचे रहिवास भूखंडमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल महापालिकेने दिलेली बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ थांबवून जैसे थे चे आदेश दिले होते. ३० दिवसांच्या आत चौकशी अहवाल संचालकांच्या मार्फत सादर करावा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र कोणताही चौकशी अहवाल आजपर्यंत महापालिका प्रशासनाने न देता त्या जागेवर अजूनही बांधकाम सुरूच आहे. महापालिकेचे अधिकारी, सत्ताधारी पक्षाचे तसेच खटोड बंधू यांच्याशी लागेबांधे असल्याने शासन निर्देशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. श्री लेक कॅसल नावाने हे बांधकाम विकसित केले जात आहे जवळपास ३० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा हा भ्रष्टाचार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

तसेच ते म्हणाले की, याच मुद्द्यावर आम्ही उच्चं न्यायालयात धाव घेतली आहे परंतु न्यायालयापुढे महापालिकेचे म्हणणे मांडले जाणे बाकी आहे त्यामुळे जास्त सांगता येणार नाही.

खटोड बंधू यांच्यासारखी महापालिकेतील डोळे पांढरे करणारी ९ प्रकरणे आपल्या रडारवर आहेत अभ्यास चालू आहे यथावकाश सगळी मुद्देसूद माहिती आम्ही जगजाहीर करणार आहोत असेही त्यांनी सांगितले . याप्रसंगी राजेश ललवाणी , सुमित मुठा , पुनीत ललवाणी , सरीत सरकार यांचीही उपस्थिती होती.

Share post
Tags: #Ajay Lalwani#Press ConferenceJalgaonMarathi NewsPoliticalराज्य सरकारची दिशाभूल करत खटोड बंधूंनी केला ३० कोटींचा घोटाळा
Previous Post

शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात!

Next Post

कबचौ उमविच्या कुलगुरूंकडे विद्यार्थी संघटनेने उपस्थित केले प्रश्न

Next Post
विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक

कबचौ उमविच्या कुलगुरूंकडे विद्यार्थी संघटनेने उपस्थित केले प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group