नवी दिल्ली : स्थानिक बाजारात गुरूवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगली वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली बुधवारी सोन्याचा भाव 385 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे. या वाढीमुळे सोन्याचा भाव 49,624 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 49,239 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला होता.
चांदीच्या भावात गुरूवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. चांदीमध्ये 1,102 रुपयांची वाढ झाली. या घटीमुळे चांदीची किंमत 66,954 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात चांदी 65,852 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. सिक्युरिटीनुसार जागतिक स्तरावर सोने-चांदीचे मूल्य वाढीमुळे भारतीय बाजारात मौल्यवान धातूची किंमतीवर परिणाम झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा हाजीर भावात बुधवारी सोन्याचा भाव 385 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तराबाबत बोलायचे झाले तर सोन्याचा वैश्विक भाव मंगळवारी 1,878 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसत होता. चांदीची वैश्विक किंमत 25.80 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, गेल्या सत्रात जबरदस्त चढ-उतारनंतर डॉलरची किंमतीत घट दिसून आली त्यामुळे सोन्यात वाढ पाहायला मिळाली. कोरोना व्हायरसचा नवा स्टेनमुळे चिंता वाढल्या आणि अनेक देशांत लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने सोन्याची किंमती वाढल्या.
वायदा बाजारात सोन्याचा भाव
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सायंकाळी 05:17 वाजता फेब्रुवारी, 2021 ला डिलिवरीच्या सोन्याचा भाव 59 रुपये म्हणजे 0.12 टक्के घटीसह 50,090 रुपये प्रति 10 ग्रॅम सुरू होता. गेल्या सत्रात सोन्याची किंमत 50,149 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होती. दुसरीकडे एप्रिल डिलिवरीच्या सोन्याचे मूल्य ९ रुपये म्हणजे 0.02 टक्के घटीसह 50,139 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होते.
वायदा बाजारात चांदीची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सायंकाळी 05:22 वाजता मार्च, 2021च्या डिलिवरीच्या चांदीची किंमत 93 रुपये म्हणजे 0.14 टक्के तेजीसह 67,669 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. गेल्या सत्रात चांदीची किंमत 67,576 रुपये प्रति किलोग्रॅमवर होता. दुसरीकडे मै 2021च्या डिलिवरीच्या चांदीची किंमत 29 रुपये म्हणजे 0.04 टक्के घटीसह 68,357 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता.