जळगांव – तांबापुरा भागातील रहिवासी व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांना पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था तसेच राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त संस्था निसर्ग मित्र समिती धुळे या संस्थेच्या वतीने २०२० या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार- २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फिरोज शेख यांनी सामाजिक, शैक्षणिक,पर्यावरण, राष्ट्रीय एकात्मता,आरोग्य या उपक्रमासह कोरोना संकटकाळात पोलीस बांधवांना व गरजू नागरिकांना मास्क वाटप, सिरसोली रोड वरील झोपडपट्टी भागात खिचडी वाटप तसेच शहरातील अत्यंत गरजू नागरिकांना किराणा वाटप करण्यात आले.
गणेशोत्सव मंडळातील गणेशभक्तांना सॅनिटाइझर व मास्क वाटप त्याच बरोबर कोरोना बाबत जनजागृती व जळगांव शहरात व ग्रामीण भागात कोविड केअर हेल्प ग्रुपच्या माध्यमातून विविध ठिकाणीआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केल्या बद्दल मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या उल्लेखनीय कार्या बद्दल फिरोज शेख यांना आय.एम.ए हॉल, Lic कॉलनी.मालेगाव या ठिकाणी.भव्य सन्मान सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष श्री.मा डॉ. तुषार दादा शेवाडे(अध्यक्ष, एम.व्ही.पी. संस्था, नाशिक) व मा.अतुलजी निकम(संचालक, नेहरू युवा केंद्र, कर्नाटक)मा.सौ.दुर्गाताई तांबे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले


