भुसावळ प्रतिनिधी । शहरात दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या आरोपीस एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. बाजार पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वर्षासाठी हद्दपार असतांना आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावर असलेल्या शमी प्रल्हाद चावरीया (वय-३०, रा. वाल्मिक नगर भुसावळ) याच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने आज बुधवारी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी हद्दपारीचे आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपी विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी २ वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
याकामी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरीफोद्दीन काजी, युनूस शेख रसूल, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, वाहनचालक ईशान यांच्यासह आदी पथकाने आरोपी शमी चावरिया याला आज बुधवारी पांडुरंग टॉकीज परिसरातून अटक केली आहे. बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.