नवी दिल्लीः पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price)मोठ्या प्रमाणात वाढल्यात. पण गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढती मागणी लक्षात घेता देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलत असतात. आज 17व्या दिवशीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झालेला नाही. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वारंवार वाढ झाली होती. अशातच आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घेऊयात.
इंडियन ऑइल वेबसाइटनुसार, गुरुवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 83.71 रुपये होता. तर मुंबईत पेट्रोल 90.34 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 85.19 रुपये प्रतिलिटर असून, चेन्नईत 86.51 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलचे दिल्लीतील दर प्रतिलिटर 73.87 रुपये असून, मुंबईत डिझेलचा भाव 80.51 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात डिझेलचे प्रतिलिटर भाव 77.44 रुपये आहेत. चेन्नईत डिझेल 79.21 रुपये प्रतिलिटर आहे.
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर
दिल्ली (Delhi Petrol Price Today): 83.71 रुपये प्रतिलिटर
नोएडा (Noida Petrol Price Today): 83.67 रुपये प्रतिलिटर
गुरुग्राम (Gurugram Petrol Price Today): 81.89 रुपये प्रतिलिटर
लखनऊ (Lucknow Petrol Price Today): 83.59 रुपये प्रतिलिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 90.34 रुपये प्रतिलिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 85.19 रुपये प्रतिलिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today): 86.51 रुपये प्रतिलिटर
पाटणा (Patna Petrol Price Today): 86.25 रुपये प्रतिलिटर
दिल्ली (Delhi Diesel Price Today): 73.87 रुपये प्रतिलिटर
नोएडा ( Noida Diesel Price Today): 74.29 रुपये प्रतिलिटर
गुरुग्राम (Gurugram Price Today): 74.44 रुपये प्रतिलिटर
लखनऊ (Lucknow Diesel Price Today): 74.21 रुपये प्रतिलिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today): 80.51 रुपये प्रतिलिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 77.44 रुपये प्रतिलिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today): 79.21 रुपये प्रतिलिटर
पाटणा (Patna Diesel Price Today): 79.04 रुपये प्रतिलिटर
आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत अशी तपासा
एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील आपण माहिती करून घेऊ शकता. इंडियन ऑइल आयओसीने दिलेल्या सुविधेअंतर्गत आपल्याला एसएमएसवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत समजते. आपल्या मोबाइलमध्ये आरएसपी आणि आपला शहर कोड लिहा आणि त्यानंतर तो मेसेज 9224992249 या नंबरवर पाठवा. आपल्या मोबाइलवर आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर त्वरित येतील. प्रत्येक शहरासाठी कोड वेगवेगळा आहे, जो आपल्याला आयओसी वेबसाइटवर सापडेल.
दररोज सकाळी 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. जरी दुसर्या दिवशी दर समान असले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डिलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर अवलंबून असतात.