जळगाव – ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे ट्रेन्स सापडल्यानं सोन्याचे भाव पुन्हा एकदा वधारले होते. त्यामुळे सलग सहा दिवस सोन्याचे दर वाढत होते. पण आज सोन्याचे दर घसरलेत. जळगावमध्ये सोन्याचे दर 330 रुपयांनी घसरले असून, सोने प्रतितोळा 51,295 रुपयांवर आलेत. तर चांदीच्या दरातही 2000 रुपयांची घसरण झाली असून, चांदीची किंमत प्रतिकिलो 68,619 रुपयांवर आलीय.
सोने पुन्हा झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
दरम्यान कालचे सोन्याचे दर 51,625 रुपये प्रतितोळा होते. तर चांदीचा दरही प्रतिकिलो 70619 रुपयांवर होता. कोरोनाची लस बाजारात येत असल्याच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. त्यामुळे सोन्याचे दर घसरत असल्याचं जाणकारांचं मत आहे.
आता सोन्याचा भाव प्रतितोळा 51 हजारांच्या आसपास आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हा भाव प्रतितोळा 80 हजार रुपयांपर्यंत जाण्याचीही शक्यता आहे. कोरोनाची लस अजून बाजारात दाखल झालेली नाही. जेव्हा ही लस बाजारात दाखल होईल, लस लागू होईल, यास किमान 2021 उजाडेल. त्यामुळे तोवर सोने तेजीत राहणार आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर सोन्याचे दर प्रतितोळा बाजारपेठेत 45 आणि 50 हजारांपर्यंत जाणार आहेत.
सोने पुन्हा झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
भारत सोन्याचा सर्वात मोठा आयात करणारा देश आहे. दागिन्यांच्या उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मुख्यतः सोन्याची आयात केली जाते. वर्षाकाठी 800 ते 900 टन सोन्याची आयात होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 44 टक्क्यांनी घसरून 14.30 अब्ज डॉलरवर गेली आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशातील सोन्याची आयात 40 टक्क्यांनी घसरून 12.3 अब्ज डॉलरवर गेलीय. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयात कमी झालीय. चालू खात्यातील तुटीवर सोन्याच्या आयातीचा परिणाम होत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या मौल्यवान धातूची आयात मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये याच काळात 20.6 अब्ज डॉलर्स होती. नोव्हेंबर महिन्यात वार्षिक आधारावर आयात 2.65 टक्क्यांनी वाढून 3 अब्ज डॉलरवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत चांदीची आयातही 65.7 टक्क्यांनी घटून 75.2 कोटी डॉलर्सवर आली आहे.
अजून वाचा
ग्राहकांना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता