Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ग्राहकांना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता

by Divya Jalgaon Team
December 23, 2020
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
अर्थसंकल्पाच्या सर्व अपडेट्ससाठी डाऊनलोड करा नवे ऍप

नवी दिल्ली – मोबाईल युजर्सला नव्या वर्षात महाग होणाऱ्या प्लॅन्सचा मोठा झटका बसू शकतो. टेलिकॉम कंपन्या मोबाईल टेरिफ वाढवण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमती वाढतील. डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफमध्ये वाढ केली होती. त्यानंतर मोबाईल नेटवर्कला अपडेट करून 2G किंवा 3G वरून 4G करण्यात आलं. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आतापर्यंत टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे. तेच पाहता आता पुन्हा टेलिकॉम कंपन्या टेरिफ वाढवण्याची योजना आखत आहेत. इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजेन्सीनुसार (ICRA), चालू आर्थिक वर्षात मोबाईल प्लॅन्स महाग होऊ शकतात.

ग्राहकांना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता

कंपन्याची कमाई 11 टक्क्यांनी वाढेल –

वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) लिमिटेडने नुकतेच आपल्या पोस्टपेड प्लॅन्सचे दर वाढवले आहेत. यामुळे 2021-22 मध्ये त्यांच्या कमाईत वाढ होईल. त्याशिवाय हाय ऑपरेटिंग लिवरेजमुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी सुधारेल. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे डेटा वापर वाढला आहे. 2020-21 मध्ये इंडस्ट्रीच्या रेवेन्ह्यूमध्ये वाढ होईल. इक्राने दिलेल्या माहितीनुसार, टेरिफमध्ये वाढ आणि सततच्या अपग्रेडेशनमुळे (Network Upgradation) टेलिकॉम कंपन्यांची कमाई 11 टक्के वाढेल. 2021-22 मध्ये जवळपास 13 टक्क्यांची वाढ होईल.

ग्राहकांना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता

कंपनीच्या कमाईसह, कर्जातही वाढ होण्याची शक्यता –

टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईमधील वाढीसह त्यांच्या कर्जातही वाढ होईल. इक्राने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीवर 4.9 लाख कोटी रुपयांचं कर्ज राहील. पुढच्या वर्षात यात काहीशी कमी होऊन 2022 मध्ये कर्ज 4.7 लाख कोटी असेल. 2020 मध्ये राईट इश्यु, क्यूआयपी आणि एडिशनल स्पॉन्सर फंड इंफ्यूजनद्वारा टेलिकॉम कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज फेडलं. त्यामुळे 31 मार्च 2020 मध्ये टेलिकॉम कंपन्यांचं कर्ज कमी होऊन 4.4 लाख कोटी रुपये राहिलं, जे 31 मार्च 2019 मध्ये 5 लाख कोटी रुपये होतं.

अजून वाचा 

आजचे पेट्रोल – डिझेल दर जाणून घ्या

Share post
Tags: #Mobile UsersMarathi NewsNew DelhiPrepaid-PospaidTechnologyग्राहकांना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता
Previous Post

आजचे पेट्रोल – डिझेल दर जाणून घ्या

Next Post

सोने पुन्हा झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Next Post
सोने - चांदी खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या

सोने पुन्हा झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group