जळगाव – शहराच्या सुरक्षेसाठी मनपाच्या अग्निशमन विभागात ४ सुसज्ज अग्निशमन बंब दाखल झाले आहे.
मनपाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार राजुमामा भोळे, महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, धीरज सोनवणे, ऍड.दिलीप पोकळे, भरत सपकाळे, अनंत जोशी, नितीन बरडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, किशोर चौधरी, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त पवन पाटील, वाहन विभाग प्रमुख गोपाळ लुले, फोरमन बाळासाहेब लासुरे, मिलींद चौधरी, अभियंता सोनगीरे, अग्निशमन विभाग प्रमुख शशिकांत बारी व कर्मचारी उपस्थित होते.
जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी आणि अग्निशमन विभाग अधिक बळकट करण्यासाठी मनपात ४ बंब नव्याने दाखल झाले आहेत. आग सुरक्षा निधी अंतर्गत १, जिल्हा नियोजन निधी अंतर्गत १, मनपा फंडातून २ बंब खरेदी करण्यात आले आहेत.
सत्ताधारी, विरोधकांनी केला होता पाठपुरावा
जळगाव शहरासाठी नव्याने दाखल होणारे बंब मे महिन्यातच मनपाला मिळणार होते परंतु लॉकडाऊन लागल्याने ते काम प्रलंबित राहिले. वाहन विक्रेत्याचे शोरूम बंद, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होऊ शकत नसल्याने वाहने अग्निशमन विभागाला मिळू शकत नव्हती. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील व महापौर सौ.भारती सोनवणे यांनी याबाबत पाठपुरावा केला. नगरसेवक नितीन बरडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे चार वर्ष पाठपुरावा केला होता. सर्वांच्या पाठपुराव्याने चारही बंब मनपाला प्राप्त झाले आहेत.