Monday, December 1, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिओ देणार कमी किंमतीत ५ जी स्मार्टफोन

by Divya Jalgaon Team
October 19, 2020
in तंत्रज्ञान
0
new jio phone news

रिलायंस जिओ पाच हजारापेक्षा कमी किमतीत ५ जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असून जशी फोनची मागणी वाढेल तसा हा फोन २५०० ते ३ हजार रुपयात युजर्स साठी उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. रिलायंस मधील अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मात्र कंपनीने कोणताही अधिकृत खुलासा त्याबाबत केलेला नाही.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिओची नजर सध्या टू जी चा वापर करत असलेल्या २० ते ३० कोटी युजर्सवर आहे. त्यामुळे सुरवातीला ५ हजार पेक्षा कमी किमतीत ५ जी स्मार्टफोन देण्याची आणि युजर्स संख्या वाढल्यावर तो आणखी कमी किमतीत देण्याची योजना रिलायंस जिओने आखली आहे. सध्या भारतीय बाजारात ५ जी स्मार्टफोनची प्राईज रेंज २७ हजार रुपयापासून सुरु आहे.

भारतीय बाजारात पहिला फोर जी फोन रिलायंस जिओने लाँच केला होता. जिओ फोन नावाने बाजारात आलेला हा फोन १५०० रुपये रीफंडेबल डीपॉझीट देणाऱ्या ग्राहकांना मोफत दिला जात होता. कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ३३,७३७ कोटी घेऊन जिओ मधला ७.७ टक्के हिस्सा गुगल ला विकण्यात आल्याची घोषणा केली होती. त्याचवेळी भारताला टूजी मधून मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

सध्या भारतात टूजीचे ३५ कोटी युजर्स आहेत. गुगल सह सहकार्य करून स्वस्त अँड्राईड फोन आणायचा प्रयत्न सुरु असून जिओ ५ जी नेटवर्क उपकरणेही उत्पादित करत आहे. ही उपकरणे निर्यात सुद्धा केली जाणार आहेत. ५ जी टेस्टिंग साठी जिओने स्पेक्ट्रमची मागणी केंद्र सरकार कडे केली आहे असेही समजते.

अजून वाचा 

Netflix च्या नव्या ग्राहकांना मोठा धक्का

Share post
Tags: Jio NewsMarathi NewsNew LounchNew Smartphoneonly Tree thousand onlyRelience jioTechnology News
Previous Post

Covid 19 : भारतात कोरोनाचा येणार दुसरी लाट

Next Post

रितेश देशमुखने केले अवयवदानाचे आवाहन

Next Post
ritesh deshmukh news

रितेश देशमुखने केले अवयवदानाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group