Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ऐंशी वर्षाचा तरूण

by Divya Jalgaon Team
December 21, 2020
in संपादकीय
0
ऐंशी वर्षाचा तरूण

राष्ट्रवादी क्राँग्रेस पक्षाचे संस्थापक खासदार  शरदचंद्र पवार हे ऐंशी वर्षाचे झाले. गेल्या ५० वर्षे या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर, राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या प्रत्येक घडामाेडीवर गारुड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार साहेब म्हणता येईल. शरद पवार यांनी घेतलेल्या लोकानिभुक निर्णयांमुळे अर्थकारण असाे, समाजकारण असाे, शिक्षण असाे, राेजगार असाे, शेती आणि त्यासंबंधित इतर गाेष्टी असाे, शरद पवारांच्या दूरदृष्टीने अनेक कामे करून ठेवली.

महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात पुढच्या अनेक पिढ्या शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय राहणार नाही.  वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनाची शरद पवार यांनी सुरवात केली.

विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमासाठी पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले हाेते. पुढे याच यशवंतरावांचे पवार साहेब अत्यंत आवडते शिष्य बनले. पुढे चालून वयाच्या अवघ्या  २४ व्या वर्षी काेणतीही राजकीय पार्श्वभूमी  नसणारा हा दमदार युवक महाराष्ट्र राज्य युवक संघटनेचा अध्यक्ष झाला. आणि इथूनच पवार  यांना यशवंतराव चव्हाण यांचा वारसदार  म्हणून पाहू जाऊ लागले. शरद पवार जास्त चर्चेत आले ते काॅंग्रेसमध्ये बंड घडवून आणत वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडत त्यांनी जनता दलाच्या मदतीने पुलाेदचे सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांच्या या कृतीने राज्यात व देशात हाहाकार उडाला.

तत्कालीन सर्वशक्तिमान नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही पवार यांनी आपली दखल घेण्यास भाग पाडले. या घटनेनंतर पवार आणि महाराष्ट्राचे राजकारण कधीच वेगळं हाेऊ शकले नाही. आणि आताही महाराष्ट्रात शिवसेना, क्राँग्रेससोबत युती करीत महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग देशाचे पंतप्रधान व देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे सर्वशक्तिमान नेत्यांपैकी असलेले नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या कुटनितीला धक्का देणारे ठरले.

शरद पवारांच्या या धक्काने भाजपा पुर्णपणे 105 चे संख्याबळ असताना सत्तेपासून दूर राहिले. वयाच्या १६ व्या वर्षी १९५६ साली एका विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून सुरू झालेला पवार यांचा हा प्रवास पुढे २४ वर्षे महाराष्ट्र प्रदेशचे युवक अध्यक्ष, १९६७ साली २७ व्या वर्षी आमदार, २९ व्या वर्षी राज्यमंत्री तर देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवत अवध्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री असा हाेत पुढे विराेधी पक्षनेते (विधानसभा आणि लाेकसभा), खासदार, संरक्षणमंत्री, कृषीमंत्री असा विविध मार्गाने समर्थपणे सुरू राहिला आणि या प्रवासात पवार यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांनी या राज्यावर आणि देशावर एकूणच दूरगामी परिणाम केेले आहेत. संपूर्ण देशात फलाेत्पादन क्रांती घडवून आणण्याचा विक्रमही पवार यांच्या नावावरच आहे.

राज्यात केलेला फलाेत्पादनाचा प्रयाेग इतक्या माेठ्या प्रमाणावर यशस्वी झाला की, पुढे या प्रयाेगाला ‘राष्ट्रीय फलाेत्पादन अभियान’ म्हणून अवघ्या देशाने स्वीकारले. त्यातून साहेबांनी रोजगार हमी याेजनाही गावाेगावी पसरवली. परिणामी, काेरडवाहू, नापीक जमिनीला नवसंजीवनी प्राप्त झाली. लाखाे उपेक्षित शेतकरी मुख्य प्रवाहात आले. महाराष्ट्रात फलाेद्यान याेजना राबवून ताेपर्यंत अप्राप्य असलेली डाळिंब आदी फळे त्यांच्यामुळेच माेठ्या प्रमाणात बाजारात आली. महाराष्ट्रातील अहमदाबादी बाेरे सर्वत्र दिसू लागली ती त्यांच्यामुळेच. इतकेच नव्हेतर, देशात शेवगा लावू नये, या अंधश्रद्धेला न जुमानता त्यांनी शेवग्याची लावगड केली हाेती.

वाइन निर्मितीला प्राेत्साहन देऊन शेतकऱ्याच्या हातात चार अधिकचे पैसे कसे येतील याकडे त्यांनी लक्ष दिले हाेते. साखर मुबलक असताना निर्यातबंदीसाठीचे व्यापारी लाॅबीचे प्रयत्न, काॅमर्स मिनिस्ट्रीशी एकहाती टक्कर घेत पवार यांनीच हाणून पाडले हाेते. कांद्याच्या भावात स्थिरता येण्यासाठी त्याचबराेबर शेतकऱ्यालाही रास्त भाव मिळावा यासाठी अनेक अंगांनी प्रयत्न करणारेदेखील पवारच हाेते.महाराष्ट्राच्या औद्याेगिक विकासाचा पायाही पवार यांनीच रचला, असे म्हणण्यास हरकत नाही.  त्यांची ही सगळी कामे पाहिली की, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या कृषी, अर्थ, सामाजिक, शैक्षणिक व राजकारणातील याेगदान पाहता त्यांच्या संपूर्ण कार्याचे मोजदान झालीच पाहिजे.

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात शरद पवारांचा प्रभाव आहे हे नाकारता येणार नाही एके काळी राष्ट्रवादीला गतवैभव होते. खासदार आमदारांची मोठी फळी सत्तेत होती. मात्र भाजपा विशेषतः एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या यशाला सुरूग लावला.  शरद पवारांनी जळगाव मध्ये नाथाभाऊंना सन्मानपुर्वक पक्षात घेऊन भाजपाची नाकेबंदी केली.  गेल्या काही दिवसांपासुन भापला एकनाथराव खडसेंनी अंगावर घेतले आहे.

पोषण आहार घोटाळा असो, वाटरग्रेस घोटाळा असो, बीएचआर घोटाळा असो यातुन जिल्ह्यातील भाजपची प्रतिमा चांगलीच मलिन होत आहे. त्यात आणखी भर पडली भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीष महाजन सह सहकारी यांच्यावर निंभोरा पोलीसात दाखल असलेल्या तक्रारीची. अशा घडामोडींमुळे  जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा नवचैतन्य आल्याचे म्हणता येईल. शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे गटतट संपवून पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी दिलजमाई सुध्दा शरद पवारांच्या वाढदिवशी घडवून आली. शरद पवार जरी ऐंशी वर्षाचे असले तरी त्यांचे संघटन कौशल्य तरूणांना प्रेरणा देणारेच म्हणावे लागेल.

नाजनीन शेख
संपादक, दिव्य जळगाव

Share post
Tags: #Sharad PawarArticleDivya JalgaonEditor- Najnin ShaikhJalgaonMarathi ArticleNajnin ShaikhNCPऐंशी वर्षाचा तरूणसंपादकीय
Previous Post

जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी निवड कार्यक्रम संपन्न

Next Post

जळगावातील शिवाजी नगरमधील ४२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

Next Post
जळगावातील शिवाजी नगरमधील ४२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

जळगावातील शिवाजी नगरमधील ४२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group