जळगाव – शानभाग सभागृह येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ संलग्नित जळगांव जिल्हा कर्मचारी संघटना स्थापन करून जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली.
यावेळी विभागीय अध्य
क्ष नानाभाऊ शिरसाठ,नाभिक समाज जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ह.भ.प.श्री.मनोहर खोंडे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय पवार भडगांव,कार्याध्यक्ष संजय वाघ बोदवड,संपर्क प्रमुख किरण नेरपगार चाळीसगांव,सरचिटणीस विजय ठाकरे,जिल्हा प्रवक्ता कुणाल गालफाडे भुसावळ,प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र बहळकर,धनराज बोरनारे रावेर, नारायण श्रीखंडे मुक्ताई नगर,देविदास बिरारी अमळनेर,चंद्रकांत निकम पारोळा, प्रा.रितेश महाले पाचोरा,नंदलाल वाघ चोपडा,डॉ.राजेंद्र साळुंखे यावल,केशव आहिरराव एरोंडोल,रोहिदास वाघ भडगांव,मंगेश पांडे, कमलाकर बनाईत भुसावळ यांच्या सह जिल्हा तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,तसेच नाशिक बोर्डावर संचालक पदी नियुक्त संजय वाघ चाळीसगांव, एल. आय. सी.मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रवींद्र सैंदाणे चोपडा, डॉ.ईश्र्वर सोनगीरे p,h,d,मिळाल्या बद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवाजीराव बहाळकर, पृथ्वीराज सोनवणे, कुमारजी सिरामे,राजकुमार गवळी यांच्या सह जिल्हा भरातून कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोहर खोंडे यांनी तर सूत्र संचालन नरेश मुऱ्हेकर यांनी केले.


